अक्कलकोट : येथील प्रसिद्ध दर्गा हजरत सय्यद शाह ताहेर कादरी (वली) यांचा 301 वा उरूस उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बुधवारी l रात्री 8 वाजता संदलची भव्य मिरवणूक लवाजम्यासह सज्जादनशीन स. सिराजपाशा उर्फ नवाब पाशा मुस्तफा कादरी यांच्या निवासस्थानातून निघून दर्ग्यात पोचली आणि सज्जादेसो यांच्या हस्ते गंधार्पण संपन्न झाले, होऊन भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरूवार रोजी उरुस (चिराँगअं ) निमित्त दर्गावर दिवे व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवार रोजी सकाळी दर्ग्यात कुराणपटन होऊन जीआरत संपन्न झाले. उरुस निमित्त शहर व परिसरातील हज़ारो भाविकांनी भक्ति भावानी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.