माढा : शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, वंचित व सामान्य घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क विभाग, धाराशिवचे उपअधीक्षक मा. धनराज शेखर भोसले यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना आणि समाजाप्रती बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ॲड. मिनलताई साठे उपस्थित होत्या.
यावेळी श्री. शहाजी साठे, श्री. दिलीप (बापू) भोसले, श्री. डी. व्ही. चवरे, श्री. यू. एफ. जानराव, श्री. गणेश (आबा) साळुंखे, श्री. विशाल कानगे, श्री. सचिन बनसोडे, श्री. शरद पाचंगे, श्री. सौरभ साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी प्राचार्य डॉ. घन:श्याम हराळे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला.
याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विद्याशाखांमध्ये तसेच कर्मवीर जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चतुर्भुज गिड्डे व प्रा. अमोल मोरे यांनी केले. प्रा. कैलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे, प्रा. सुनील रोडगे, डॉ. संगीता पैकीकरी, डॉ. रविराज कांबळे, डॉ. सतीश घाडगे, प्रा. जितेंद्र चव्हाण, विद्यार्थी तसेच रयतप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Post Views: 9