सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभाग, ‘सुसंवाद’ विद्यार्थी संघटना आणि सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *‘AI आणि माध्यमांची भूमिका’* या विषयावर आजी-माजी विद्यार्थी मेळावा व मार्गदर्शन संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
*शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६* रोजी सामाजिक शास्त्रे संकुलातील सभागृहात *सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत* हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक *प्रा. डॉ. गौतम कांबळे* राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. योगेश बोराटे* उपस्थित राहणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विभागप्रमुख *डॉ. रविंद्र चिंचोलकर* सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास विभागप्रमुख *डॉ. प्रभाकर कोळेकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.*
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये दैनिक सकाळचे सहयोगी संपादक *श्री. सिद्धाराम पाटील*, सोलापूर महानगरपालिकेच्या विधी व न्याय समितीचे सभापती *श्री. सत्यजित वाघमोडे*, सकाळचे *श्री. सुदर्शन सुतार* ॲग्रोवन , *श्रीमती श्वेता हुल्ले* निवेदिका तसेच ‘सुसंवाद’ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष *श्री. सोमनाथ पवार* यांचा समावेश आहे.
‘सुसंवाद’ विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी टीम
‘सुसंवाद विद्यार्थी संघटने’च्या अध्यक्षपदी श्री. सोमनाथ पवार, सचिवपदी श्री. दशरथ कुंभार, खजिनदारपदी डॉ. येवसेप जगताप, उपाध्यक्षपदी
श्री. विजयककुमार पारसेकर, सहसचिवपदी श्री. आनंद बिराजदार आणि प्रमुख संघटकपदी डॉ. अंबादास भासके कार्यरत आहेत.
या मेळाव्यास आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.