पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन पंकज विठ्ठल मदने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .यावेळेस संस्थेचे सचिव श्रीकृष्ण सावंत यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडला या संस्थेचे एकुण 1237 सभासद आहेत. यामध्ये 293 कर्जदार सभासद आहेत तर 944 सभासद हे बिगर कर्जदार आहेत. संस्थेने 2 कोटी 85 लाख 61 हजार 400 रुपये एवढे कर्ज वाटप करण्यात आले आहे.तर वसुली 2,55,71,500 रुपये म्हणजेच 92 टक्के कर्ज वसुली झाली आहे. तर थकबाकी 21 ,47,900 एवढी 21 सभासदांकडे थकबाकी आहे. संस्थेस चालु वर्षांत 21 87434 एवढा नफा झाला आहे. चालु आर्थिक वर्षांत संस्थेस ब ऑडीट वर्ग मिळाला आहे. यावेळी संस्थेच्या कामकाजाची सविस्तर माहीती सभासदांना देण्यात आली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस माजी चेअरमन संग्राम पाटील, सुग्रीव लेगरे, विठ्ठल मदने सर, आनंद पाटील, नबाजी मदने, कुबेर भैस, किसन सातपुते, महादेव सुळे उपस्थित होते .तर यावेळी माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, बाबुराव पाटील, नजीर मुलाणी, शिवप्रसाद पुकळे, श्यामराव मदने, विजय मदने, जितेंद्र पाटील, सिताराम धायगुडे, क्लार्क विजय सपाटे, शिपाई सुरज काटकर यांच्यासह अनेक सभासद व मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक विठ्ठल मदने सर यांनी आभार मानले. चौकट _ यावेळी विद्यमान व्हा. चेअरमन पोपट गोडसे, संचालक जाफर मुलाणी ,संचालिका रंजना जावळे, सुलाबाई जरग हे वार्षिक सर्वसाधारण सभा असतानाही अनुपस्थित होते यामुळे सभासदामधुन नाराजी व्यक्त करण्यात आली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















