मोडनिंब – जाधववाडी (ता. माढा) येथील गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या स्वखर्चातून गावासाठी पाइपलाइन कामास प्रारंभ करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. पाझर तलावात १० इंची पाईपद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर सुटणार आहे. आमदार अभिजित पाटील यांनी परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासकीय मंजुरी किंवा निधीच्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी स्वखर्चातून या जलवाहिनीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेअंतर्गत जाधववाडी हद्दीतील वरच्या बाजू जाधववाडीच्या शिवेवर सीना-माढाचे पाणी आलेले आहे. या ठिकाणाहून पाझर तलावात हे पाणी आणले जाणार आहे. या थेट जोडणीमुळे आता जाधववाडी आणि परिसरातील पाणीटंचाई कायमची दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. उजनीचे पाणी येणाऱ्या आठ नंबर कॅनॉल फाट्यावरून ६७० मीटर लांबीची दहा इंची पीव्हीसी पाइपलाइन आणि विद्युत पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी पाइप जाधववाडीत दाखल झाले. या ११६ पाईपचे पूजन जिल्हा परिषदचे माजी सभापती भारत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच बाबुराव सुर्वे, मोडनिंब ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, कुरण गिड्डे, शिवाजी सुर्वे, भाजपचे नितीन गडधरे, डॉ. संतोष दळवी, प्रवीण माने, विठ्ठल मोरे, सौदागर जाधव, संभाजी काळे, राजकुमार जाधव, अभिजित जाधव, उदय जाधव, संतोष मुटकुळे आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















