सोलापूर- भारताकडे मोठ्या प्रमाणात मानवशक्ती असून, या मानवशक्तीला योग्य दिशा देऊन सक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोणगे यांनी मेसॅनिक हॉल येथे रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार 2026 चे वितरणाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उपप्रांतपाल रोटे. वंदना कोपकर, अध्यक्ष रोटे. बसवराज बिराजदार, सचिव रोटे. संतोषकुमार सावळगी, रोटे. सत्यम दुधनकर आदी उपस्थित होते.
यावर्षी पाच शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात त्यात वॉलचंद अभियांत्रिकीचे प्रा. दीपक मसलेकर, व्हॅलेंटायईन सर्कल इंग्लिश मेडियम स्कूलचे श्वेता पसनूर, रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्सचे आण्णा बाबू दीक्षित, जि.प.स्कूल केगांवचे शर्मिला परदेशी, सुयश विद्यालयाचे प्रा. तहसील जावीद जमादार यांना प्रमुख पाहुण्यांचा हस्ते देण्यात आला.
प्रारंभी क्लबचे अध्यक्ष प्रा. बसवराज बिराजदार यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर रोटे. सत्यम दुधनकर यांनी नेशन बिल्डर ॲवॉर्डबद्दल माहिती देताना सांगितले हे गेल्या ११ वर्षापासून हे पुरस्कार शिक्षकांना देत आहे आणि हे पुरस्कार एक राष्ट्रीय पुरस्कारसारखाच आहे कारण रोटरी क्लब हे सर्व जगात आहे. उपप्रांतपाल वंदना कोपकर यांचा परिचय रोटे. डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी तर प्रमुख पाहुणे डॉ. बी. के. सोनगे यांचा परिचार रोटे. डॉ. उमाकांत जाधव यांनी करून दिला.
डॉ. सोणगे पुढे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी केवळ मनुष्यबळ पुरेसे नसून त्याला योग्य संस्कार, ज्ञान, कौशल्य आणि मूल्यांची जोड देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना निर्माण करावी.
यावेळी उपप्रांतपाल वंदना कोपकर यांनी ही सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सत्कार उत्तर देताना पुरसकार प्राप्त शिक्षक अण्णाबापू दीक्षित आणि प्रा. दीपक मसलेकर यांनी क्लबचे आभार मानले.
यावेळी क्लबचे रोटे. अकबरसाहेब नदाफ, खजिनदार रोटे. महेश साळुंके, रोटे. इक्बाल बागबान, रोटे. दीपक भोगे, रोटे. उमाकांत जाधव, रोटे. निहाल तांबोळी, रोटे. समीर नदाफ, प्रा. व्ही. पी. कुलकर्णी, प्रा. एम. बी. आवटे आदी उपस्थित होते. शेवटी सचिव रोटे. संतोष सावळगी यांनी आभार मानले.
Post Views: 24