बार्शी – येथील सौ. सुमन शिवानंद चंद्रशेखर यांच्या ‘मायेची पाखर’ या कादंबरीसाठी व ‘आठवणींचा दरवळ’ या ललितलेख संग्रहासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे स्व.राजाराम डाकवे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डाकेवाडी, पोस्ट काळगाव, ता. पाटण, जि. सातारा येथे महंत अहिल्यागिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि डॉ. संदीप डाकवे, शिवसमर्थ मल्टिपर्पज पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संभाजीराव पाटणकर, वक्ते व लेखक प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र कंटक, विशाल पाटील, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, सानिका माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. बार्शीतील साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सौ. सुमन चंद्रशेखर यांचे अभिनंदन केले आहे.