सोलापूर – सीना नदीत बिनधास्त वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर मंद्रूप पोलिसांनी मोठा हातोडा मारला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री ११.३० वाजता राजूर-सिंदखेड दरम्यान सीना नदी पात्रात धाड टाकली. इरप्पा रणखांबे यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१५ लाखांचे ३ टेम्पो, ४ लाखांची स्विफ्ट डिझायर कार
, १ लाख ७० हजारांच्या दुचाकी व २ लाखांचे मोबाईल असे एकूण २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून ७ आरोपी अटकेत आहेत. तर ३ आरोपी फरार आहेत.
अर्जुन नाईकवाडी, रोहित पवार, सागर पवार, हणमंतु कुंभार, शिवानंद व्हनमाने, गणेश पाटील, विजय रणखांबे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून ७ जणांना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार आहेत.
रस्ता नसतानाही ३ दिवस सापळा रचून केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शना खाली गणेश शिंदे, रविंद्र चव्हाण, अशपाक मियाँवाले, बिराण्णा वाघमोडे, चेतन गवंडी, गणेश पाटील यांनी केली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















