सोलापूर : सरस्वती चौक नवरात्र महोत्सव मंडळ व बहुउद्देशीय संस्था, सोलापूरच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष शेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी योगेश मादास, खजिनदारपदी प्रभाकर देशमुख, सहखजिनदारपदी पुरुषोत्तम पवार, सचिवपदी चरण शेंडगे व मुकुंद मोरे यांची निवड करण्यात आली. मिरवणूक प्रमुख म्हणून गुरु चव्हाण व संदीप माने, तर पूजा प्रमुख म्हणून सुनील नवगिरे व विकी सणके यांची तर सल्लागार म्हणून प्रशांत माने, नागेश पवार, करण काकडे, धन्यकुमार पांढरे, नागेश राजोतिया, रोहित पवार, निखिल सातपुते, केवल पांढरे व आप्पा बिराजदार यांची निवड करण्यात आली.
नवरात्र महोत्सव अधिक उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासोबतच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. नूतन कार्यकारिणी सन २०२६-२७ या वर्षासाठी कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष संतोष शेटे यांनी सांगितले.
—
Post Views: 20