करकंब – भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील ओसाड माळावरील ग्रामपंचायतच्या मालकीच्या ओसाड माळरानावर ८ वर्षांपूर्वी साकारण्यात आलेल्या ड्रीम गार्डनचे सुशोभीकरण करण्यास अखिल भारतीय यलमार समाज संघटनेचे अध्यक्ष कै.संग्राम पाटील यांच्या स्मरणार्थ मुंबई येथील उद्योजक आनंद पाटील यांनी सुरू केले आहे.ड्रीम गार्डनमध्ये मोठमोठाले आकर्षक दगड लावण्यात येणार आहेत.अजित कंडरे युवाउद्योजक मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण,एनटीपीसी ग्रामपंचायत,पंचायत समिती सदस्य या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,सामाजिक वनीकरण जिल्हा प्रमुख सुवर्णा माने,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,सामाजिक वनीकरन पंढरपूर तालुका अधिकारी किशोर आहेर,सुहास गुराडे या सर्वांच्या सहकार्याने भंडीशेगाव येथील माळरानावर आठ वर्षांपूर्वी १७,५०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती.हे सर्व वृक्ष आज अत्यंत सुस्थितीत असून या वृक्षांचे अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले आहे.सामाजिक वनीकरण वनीकरण अधिकारी यांनी सातत्याने. केलेला पाठपुरावा, ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे हे ड्रीम गार्डन पूर्णपणे विकसित झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या ड्रीम गार्डनमध्ये जंगली झाडाबरोबरच फळांच्या झाडांची देखील लागवड करण्यात आली आहे.कोरोना कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून ग्रामीण भागातील कोविड सेंटर भंडीशेगाव येथे सुरू करण्यात आले होते.या कोविड सेंटरमधून शिल्लक राहिलेल्या पैशांमधून ड्रीम गार्डन येथे खूप मोठा पाझर तलाव तयार करण्यात आला आहे.तसेच या ड्रीम गार्डनमध्ये नैसर्गिक असे ७ पाझर तलाव आहेत.
चौकट.
ड्रीम गार्डन शेजारीच कासाळ ओढ्यावरती सुंदर असा बंधारा बांधण्यात आला आहे.या ठिकाणी भविष्यात चांगल्या प्रकारे बोटिंग सुविधा होऊ शकते.ड्रीम गार्डनमध्ये लवकरच लहान मुलांसाठी खेळणी,व्यायामाचे साहित्य,पक्षी व प्राणी प्रेमींसाठी एक मनोरा टॉवर उभा करण्याचा मानस असल्याचे अजित कंडरे यांनी यावेळी सांगितले.ड्रीम गार्डनमध्ये लवकरच पक्षी निरीक्षण चा टॉवर उभा करण्यात येणार असल्याने प्राणी प्रेमी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Post Views: 20