सांगोला – शिवभक्त जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श नाभिक समाज सेवा मंडळ व आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाळा, वाढेगाव येथील १०१ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दूरवरून शाळेत पायी येणाऱ्या तीन गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या. प्रारंभी जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इ.५ वीची विद्यार्थिनी अनुष्का फरकांडे हिने जिवाजी महाले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. या प्रसंगी मुख्याध्यापिका वैशाली कलुबर्मे, उपशिक्षिका संगीता ठोकळे, स्वाती घोंगडे, शिक्षक नवनाथ साळुंखे, हरिश्चंद्र लवटे, शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष वसमळे, प्रवीण हजारे, संतोष फरकांडे, अंगणवाडी सेविका सुनीता लोकरे तसेच आदर्श नाभिक समाज सेवा मंडळाचे साहेबराव जाधव, सुशील गवळी, शंकर खंडागळे, हनुमंत काळे, सिद्धेश्वर काळे, मनोज खंडागळे, समाधान सुरवसे, नितीन भोसले, तानाजी खंडागळे, सोमनाथ गवळी, गौरव काळे, अनिल काळे, संतोष चव्हाण, रामदास काळे, विनायक सागावकर, संतोष जगताप, तानाजी खंडागळे, संकेत माने, सूरज काळे, अजय चव्हाण, दगडू काळे, आपुलकी प्रतिष्ठानचे राजेंद्र यादव, संतोष महिमकर, अरविंद डोंबे, चंद्रशेखर कवडे, अमर कुलकर्णी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
Post Views: 12