सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले.
मुलांच्या संघात इब्रामपूर ओम, तावरे प्रणव, बेंद्रपे अथर्व, काळे गितेश, सय्यद मुद्दासर, जाधव प्रथम, मडिवाळ प्रतीक, शेख अक्रम, आयगोळे विनीत, गायकवाड सुयश, तलकोकुल श्रीनाथ, पठाण अब्दुल्ला यांचा सहभाग होता . मुलांचा पहिला सामना एन. बी. नवले कॉलेजशी, दुसरा सामना बी.एम.आय.टी. कॉलेजशी झाला, तर अंतिम सामन्यात त्यांनी सोशल महाविद्यालयाचा पराभव करून विजय मिळवला.
मुलींच्या संघात चव्हाण श्रुतिका, ताटीपामुल रोशनी, कुरडे मधुरा, दरूवाले साजिया, पठाण लोईजा, रंगदाळ अर्चना, निंबाळकर गौरी, डांगे ईरम, खरादी रबियाबसरी, चिक्कळी आशिया, टाकळी प्रतीक्षा, उपासे पूनम यांनी यशस्वी खेळ केला.
खेळाडूंचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव प्रा. ज्योती काडादी, शैक्षणिक सल्लागार पी. एम. दर्गोपाटील, प्र-प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



















