बार्शी – उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयातील ८० गरजू विद्यार्थ्यांना ‘सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे’ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे किट नुकतेच प्रदान करण्यात आले. पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. विजयकुमार जगताप यांच्या विशेष पाठपुराव्यातून आणि प्रयत्नांतून हा उपक्रम पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा व त्यांच्या अध्ययनात खंड पडू नये, या सामाजिक बांधिलकीतून श्री. जगताप यांनी सेवा सहयोग फाउंडेशनशी संपर्क साधून हे साहित्य उपलब्ध करुन दिले. श्री. विजयकुमार जगताप यांच्या हस्ते हे शैक्षणिक किट विद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पुढाकार घेऊन सहकार्य केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दयानंद रेवडकर यांनी श्री. जगताप आणि ‘सेवा सहयोग फाउंडेशन’चे आभार मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 20