नागपूर स्मार्ट अॅंड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिव्यांग बांधवांना ई-रिक्षांचे वितरण केले. ई-रिक्षाने गरिबांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला. या माध्यमातून गरीब, दिव्यांग यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे शक्य होणार आहे, असे मत या वेळी श्री गडकरीजी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास आ. श्री कृष्णा खोपडे, आ. श्री विकास कुंभारे, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी श्री गुल्हाने, श्री पांडुरंग मेहेर हे उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















