मोडनिंब – सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या मोडनिंब लघुवितरिका क्रमांक आठला तातडीने पूर्ण दाबाने पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौदागरदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. उपकार्यकारी अभियंता तुंबळ यांनी १९ ऑक्टोबरपर्यंत टेलपर्यंत पूर्ण दाबाने पाणी देण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रस्ता रोको आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. उपकार्यकारी अभियंता तुंबळ यांनी १९ ऑक्टोबरपर्यंत मोडनिंब लघुवितरिका क्रमांक आठच्या टेलपर्यंत पूर्ण दाबाने पाणी देण्याबाबत लेखी आश्वासन दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.मात्र, १९ ऑक्टोबरपर्यंत पाणी मिळाले नाही, तर जाधववाडी आणि बैरागवाडी येथील महिला पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा सौदागरदादा जाधव यांनी दिला. आंदोलनात प्रमोद वसेकर, मनोज शहा, बिभीषण रणदिवे, प्रशांत गिड्डे, रशीद सय्यद, तुळशीचे सरपंच शरद मोरे, नितीन गडदरे, दिग्विजय कांबळे, अमोल गिड्डे, नागेश राऊत, बालाजी पाटील, पांडुरंग देशमुख, विलास जाधव, अनिल माळी, मारुती माळी, गणेश जाधव, जालिंदर गोडंवळे, राजकुमार जाधव, महादेव मोरे, अभिजीत चव्हाण, गणेश महाडिक, शरद शिंदे, शिवाजी सावंत, उत्तम सावंत, प्रवीण जाधव, अंकुश चोपडे, पांडुरंग रणदिवे, गणेश रणदिवे, चैतन्य पाटील, लखन पाटील, गणेश गिड्डे, समाधान देशमुख, बालाजी सुर्वे, अभिजीत जाधव, अंकुश जाधव, शफिक शेख, सावता रणदिवे, श्रीकांत जाधव, आनंद पाटील, वैभव पाटील, सागर गिड्डे, रमेश जाधव, अरुण चव्हाण, लक्ष्मण जाधव, काकासाहेब सुर्वे, सुशांत देशमुख, वैभव सुर्वे, वैभव साठे आणि अनुप माळी यांच्यासह जाधववाडी, बैरागवाडी, अरण, तुळशी व मोडनिंब परिसरातील शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















