बार्शी – बार्शी बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या पर्समधून जवळपास साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने नेल्याची घटना गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी सुलताना शहाजहान मोगल (वय ५०, रा. कात्रज, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
सुलताना मोगल या पती शहाजाहान आणि नातू आराफ यांच्यासह नातेवाइकांना भेटण्यासाठी कुडुवाडी येथे जाण्याकरिता गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बार्शी बसस्थानकावर आल्या होत्या. यावेळी यावल ते पंढरपूर जाणारी बस आल्यानंतर त्या कुटुंबीयांसह बसमध्ये चढल्या. बसच्या आसनावर बसल्यानंतर त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण आणि कानातील दागिने तपासले असता ते गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बसमधून उतरून परिसरात शोध घेतला; मात्र दागिने मिळून आले नाहीत. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला.
Post Views: 29