ऋतुजा ला तिचे वडिल ब्रम्हदेव श्रीमंगले यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षा पासून ग्राउंड वर घेऊन सराव घेतला, ते स्वतः तिच्या सोबत धावायचे.
ऋतुजा ही स्थानिक जागृती विद्या मंदिर या शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तिने क्रीडा मैदानावर दाखवलेल्या या अफाट कौशल्यामुळे आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आपल्या या दैदिप्यमान यशाचे श्रेय तिने मार्गदर्शकांना दिले आहे. तिला या स्पर्धेसाठी श्री विराट अकॅडमीचे सूर्याजी लंगडे व भारती लंगडे, तसेच जागृती विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक श्री. जाधव सर आणि मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ऋतुजाच्या या यशामुळे तिच्या शाळेच्या आणि अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे नाव उंचावले आहे.




















