बार्शी – विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासह त्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील क्षमतांना चालना देण्यासाठी व्ही. के. इन्स्टिट्यूट, बार्शीच्या वतीने मिडब्रेन ॲक्टिव्हेशनसह विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. चित्रकला, गायन, नृत्य, रंगभरण आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सौ. वनुजा कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राहुल पालके, गोरक्षणाथ भांगे, बसवराज पुरवंत, प्रा. ज्योती डोळस आणि प्रा. शोभना क्षीरसागर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला, कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मान्यवरांनी कौतुक केले.
स्पर्धेतील विजेते- प्रथम : विश्वा भांगे, प्रितम कबाडे, राजवीर परदेशी, प्रिया करगल आणि श्रीशा क्षीरसागर.
द्वितीय : श्लोक म्हेत्रे, प्रेम कबाडे, लव्या परदेशी, साईप्रसाद कबाडे आणि तेजस्वी हुंबे.
तृतीय : दर्शनी कट्टीमणी आणि प्रतीक कबाडे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कबाडे यांनी केले. निलेश कोटकर आणि तेजश्री म्हेत्रे यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. सारिका कबाडे, सौ. शुभांगी मस्तूद, प्रथमेश निरंजन, यशराज कबाडे, श्रद्धा कबाडे आदींनी सहकार्य केले.
Post Views: 9