सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध मोगले साडी सेंटर येथे झालेल्या १० लाख ७० हजार रुपयांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला मा.वी एम रेडकर या न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोगले साडी सेंटरमधील कॅश काउंटरमधील ७० हजार रुपये व तिजोरीतील १० लाख रुपये, अशी एकूण १० लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर आरोपीतर्फे न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सदर अर्जावर आरोपीतर्फे ॲड. प्रणव उपाध्ये यांनी युक्तिवाद केला. तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला प्रत्येक सोमवारी दुपारी १२ ते १ या वेळेत जोडभावी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. प्रणव उपाध्ये व ॲड. भागवत इंदापूरकर काम पाहिले.
Post Views: 4