सोलापूर : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने रावजी सखाराम हायस्कूल, सोलापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व विचारधन या पुस्तकांचे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची व विचारांची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पवार, प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र शहा – कासवा, पदमचंद राका उपस्थित होते. विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व विचारधन या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रशालेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला चंद्रकांत तमशेट्टी, मारुती खानापुरे, भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र बाबा बाबरे, सचिव अकबर शेख, उपाध्यक्ष ॲड. विशाल मस्के, रावजी सखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक भरत केत , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सर्वगोड, कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावजी सखाराम हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह भीम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले, तर रमेश वडाराव यांनी आभार प्रदर्शन केले.
——–
Post Views: 19