अक्कलकोट – डॉ.हर्षदा पुराणिक यांचा सोलापूर ते पुणे येथील शैक्षणिक प्रवास हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन
व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी व्यक्त केले.
मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या
डॉ.हर्षदा हेरंब पुराणिक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून औषध निर्माण शास्त्रात पी.एच.डी.पदवी संपादन केल्याबद्दल येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी डॉ.हर्षदा पुराणिक यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी चेअरमन महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की, डॉ.पुराणिक यांचा संशोधनाचा विषय मानवी शरीरातील चयापचयाशी संबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी विषमचक्रीय संयुगांचे संश्लेषण, रचना आणि जैविक मूल्यमापन असा आहे. मधुमेह आणि लठ्ठपणा यावरील त्यांचे संशोधन वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. त्या सध्या खाजगी विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी फार्मास्युटिकल केमिस्ट्री विषयात ३ पुस्तके व अनेक संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. गेल्या १३-१४ वर्षांपासून त्या बी.फार्मसी विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत. डॉ. पुराणिक यांनी शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांचे मधुमेहासारख्या विकारांवरील संशोधन समाजाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असेही मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, विपूल जाधव आदींसह पुराणिक कुटूंबीय व भाविक भक्त उपस्थित होते.
Post Views: 11