सांगोला – सांगोल्यातील फॅबटेक पॉलिटेक्निकच्या टीम कायनेटिक झिरो रेसिंग या विद्यार्थी संघाने इंडियन कार्टींग रेसिंग यांच्या वतीने नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या गो-कार्ट स्पर्धेत देशभरातील ४६ संघांशी स्पर्धा करत बेस्ट इंजिनिअरिंग एक्सलन्स आणि आयएसआयई फ्युचर अवॉर्ड हे मानाचे दोन पुरस्कार प्राप्त केले. महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक स्तरावरील पहिला संघ म्हणून फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी मान पटकवला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर या संघाने सर्वप्रथम गो-कार्टची तांत्रिक तपासणी आणि ब्रेकिंग टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर ऑटोक्रॉस, स्किडपॅड आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (बीआयसी), नवी दिल्ली येथे झालेल्या एन्ड्युरन्स स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत संघाने स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली. हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रा.बिरा वगरे, प्रा.स्वप्निल बंडगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
चोकट-
फॅबटेक संस्थेचे उद्दिष्ट केवळ पुरस्कार मिळवणे नसून विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक ज्ञान प्रत्यक्षात उतरवून, नवनिर्मिती करावी आणि त्यांच्या कौशल्यात प्रगती साधावी हे आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.
-डॉ.अमित रुपनर