सोलापूर – शालेय शहर बास्केटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने उपविजेते संपादिले.
सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली. या स्पर्धेतून सांगोला येथे होणाऱ्या पुणे विभागीय बास्केटबॉल चाचणीसाठी हाजरा इरफान शेख व हादिया फारुक मुल्ला यांची निवड झाली.
या संघास क्रीडा शिक्षिका सईदा दारूवाले, अनिसा नालबंद, वसीम बागवान, मोईम सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्या तहसीना शेख, आरिफ पठाण व सर्व स्टाफने विजयी संघाचे कौतुक केले.
उपविजयी संघ : कायनात शेख, हादिया मुल्ला, हाजरा शेख , समीम शेख , अरशा शिकलकर, तह्मीन शेख, अक्सा पठाण तहरीम पठाण , नुजहत शेख,अलिना नदाफ.























