सोलापूर – टी. व्ही. महाराष्ट्र न्यूजतर्फे दिला जाणारा ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार २०२६’ शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशालेतील संस्कृत शिक्षक निखिल बडवे व पर्यवेक्षक डॉ.मारुती शहाणे यांना जाहीर झाला आहे. संस्कृत विषयातील उल्लेखनीय कार्य तसेच संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
टी. व्ही. महाराष्ट्र न्यूजतर्फे सन २००० पासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यामध्ये डॉक्टर, अभियंते, वकील, शिक्षक, उद्योजक आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो.
संस्कृत भाषेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाविषयी आवड निर्माण करणे तसेच संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने प्रयत्न करणे या कार्याची दखल घेत निखिल बडवे यांना तर तंत्रस्नेही शिक्षक तथा पर्यवेक्षक डॉ. मारुती शहाणे विज्ञानचे प्रयोगशील उपक्रम सादर केल्याने यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळीचे सदस्य व शाळा समितीचे अध्यक्ष मा. सुरेशबाबू मंकणी, मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रकाश कांबळे, उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे तसेच पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, गणेश नेवरे आणि महेंद्र रणधीर यांनी निखिल बडवे व डॉ.मारुती शहाणे यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर पुरस्कार सरकारी विधिज्ञ मा. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.