पंढरपूर – शहरातील मोकाट श्वानांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी तसेच नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस शिक्षक, प्राचार्य, बसस्थानक व रेल्वेस्थानक व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी शहरातील शाळा-महाविद्यालये, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरातील मोकाट श्वानांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासोबतच प्राण्यांबाबतच्या लागू नियमांचे पालन करून या समस्येवर प्रभावी आणि मानवी दृष्टिकोनातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात येणार आहे.
Post Views: 14