बार्शी – रस्त्यावर सापडलेली पर्स प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्द करून रिक्षाचालक मनोज जगताप यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या कृतीचे बार्शी शहरात कौतुक होत आहे.
दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी बार्शी-कुर्दुवाडी रस्त्यावरील पोद्दार शाळेजवळ मनोज जगताप यांना एक लेडीज पर्स सापडली. या पर्समध्ये सुमारे ७० हजार रुपयांचा मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. जगताप यांनी ही पर्स
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्याकडे सुपूर्द केली. पर्समधील कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेतला. त्यानंतर बार्शीतील कासारवाडी रोड परिसरात राहणाऱ्या आणि परंडा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या कांचन बरडे यांना पर्स परत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, बार्शी रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे उपस्थित होते. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views: 16