बार्शी – तालुक्यातील शेलगाव (मा.) येथे शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे स्प्रिंकलरचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शेतकरी रमेश सिद्राम खांडेकर (वय ६२, रा. शेलगाव (मा.), ता. बार्शी) यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश खांडेकर यांच्या गट क्रमांक २७१ मधील कांदा पिकाच्या शेतातून स्प्रिंकलरचे अंदाजे ४ हजार ८०० रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या चोरीप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून,
शेतातील सिंचन साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Post Views: 11