बार्शी – श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. स्वामीसमर्थ माळी व ऋतुराज ढेरे या गुणवंत खेळाडूंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या संघात निवड झाली असून, ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कोटा, ( राजस्थान ) येथे दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ संघाचे सराव शिबिर के. एन. भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी येथे डॉ. प्रशांत तांबिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या शिबिरातून खेळाडू स्पर्धेसाठी कसून सराव करीत आहेत.
या दोन्ही खेळाडूंच्या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे कौतुक केले.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर व डॉ. रामहरी नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले.