सोलापूर : सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल मोटिव्हेशनल राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. येत्या बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
एबीएम (अमोल भगत मीडिया) आणि संस्कृती पब्लिकेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘सेकंड एडिशन सरदार वल्लभभाई पटेल मोटिव्हेशनल अवॉर्ड २०२६ – बेस्ट कॉन्ट्रिब्युशन इन सोशल ॲक्टिव्हिटीज’ या पुरस्कारासाठी भतगुणकी यांची निवड झाली आहे. हैदराबाद येथील गाचीबावली परिसरातील लेमन ट्री हॉटेलमध्ये २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
भतगुणकी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. शेतकरी हितासाठीचे प्रयत्न, कृषी पर्यटन, राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र, हुरडा पार्टी, ड्रीम फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी कौशल्य विकास उपक्रम तसेच साहित्य संमेलनांच्या आयोजनातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांतून प्रेरणा घेत सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. भतगुणकी यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
—–
Post Views: 28