धाराशिव : केंद्रस्तरावर आयोजित ‘मी आज असे पाणी वाचविले’ या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेत श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशन संचलित विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय, रामनगर, धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी विविध गटांत यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी :
• अधिरा पांडुरंग गवळी – निबंध स्पर्धा, इयत्ता पहिली ते पाचवी गट, द्वितीय क्रमांक.
• सय्यद शाहिद हसन – चित्रकला स्पर्धा, इयत्ता पहिली ते पाचवी गट, तृतीय क्रमांक.
• कृष्णाली सुभाष गडकर – चित्रकला स्पर्धा, इयत्ता सहावी ते आठवी गट, प्रथम क्रमांक.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले आहे. या यशाबद्दल श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
पाणी बचत, जलसंवर्धन आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनी भविष्यातही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे आणि शाळेचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.



















