सोलापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत मागास समाजसेवा मंडळ, नेहरूनगर, सोलापूर संचलित श्री वसंतराव नाईक हायस्कूलच्या विद्यार्थिनीने 800 मीटर धावणे मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
दि. १६ ऑक्टोबर २०२६ वार शुक्रवार रोजी विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु. भावना विशाल झंपले हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष (काका) चव्हाण, मुख्याध्यापक कार्तिक सुभाष चव्हाण आणि पर्यवेक्षक श् युवराज पारधे यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडाप्रेमींनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनीला प्रशालेचे क्रीडाशिक्षक नामदेव देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले त्यांचेही सर्वांच्या व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले पुढील विभागीय स्पर्धेसाठी तिला सर्वांच्या वतीने यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..