सोलापूर : आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा अतिवापर टाळून विद्यार्थ्यांनी आपला अर्धा वेळ पुस्तक वाचनासाठी दिला पाहिजे. वाचनामुळेच संवाद कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते, असे प्रा. मोहन चव्हाण यांनी सांगितले.
वाचन संस्कृती रुजावी आणि तरुणांमध्ये पुस्तकांबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी ‘जागृती ॲडव्हान्स लायब्ररी’ला लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थिनींचे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. मोहन चव्हाण, प्रा. महेश रणदिवे, पत्रकार विजय गायकवाड, जागृती लायब्ररीचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सचिव रेणुका गायकवाड , संजीवनी गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तम नियोजन करून सुरू केलेले हे वाचनालय म्हणजे सोलापूरच्या साहित्य वर्तुळासाठी एक पर्वणीच असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
—-
Post Views: 29