जेऊर – सालसे (ता.करमाळा) येथील सानिका संतोष काळे हिने छत्रपती संभाजीनगरच्या वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन 48 किलो वजनी गटात महिला जुडो स्पर्धा मध्ये उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
हे सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिची राष्ट्रीय स्तरावरील जुडोस्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यापुढे ती देशाचे नेतृत्व करणार असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सानिका ही एक उत्तम कुस्तीपटू देखील आहे. यापूर्वीही तिने कुस्ती आणि जुडो स्पर्धा मध्ये सोलापूर, नागपूर, चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करत विविध स्पर्धा मधून यश संपादन केलेले आहे. दोन्ही खेळांमध्ये लागणारी ताकद,चपळता, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीची जोरावरती तीने हे यश मिळवले आहे.
Post Views: 14