जेऊर – करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी आदित्य चांदगुडे हिने सोलापूर ग्रामीणचे प्रतिनिधित्व करत विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलापूर विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धा (सर्व वयोगट मुले व मुली) या वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पिंपरी चिंचवड, क्रीडा प्रबोधिनी, मिशन लक्षवेध अशा भागातून स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची खेळाडू कु. आदिती जितेंद्र चांदगुडे हिने सोलापूर ग्रामीणचे प्रतिनिधीत्व करत विभागीय स्पर्धांमध्ये १९ वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवित यश संपादन केले. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख प्रा. रामकुमार काळे व मल्लखांब कोच श्री.सागर शिरस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















