सोलापूर – मलकापूर (बुलढाणा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राज्य शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत पुणे विभागाच्या मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावून दुहेरी मुकुट संपादला. या संघात सोलापूरच्या चार मुले व तीन मुलींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील आठ विभागांच्या संघांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत पुणे विभागाच्या खेळाडूंनी येथील प्रशिक्षक शिवाजी वसपटे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी हे यश मिळविले. या यशाबद्दल पुणे क्रीडा अधिकारी महेश चावले, सॉफ्ट टेनिस राज्य सहसचिव विल्सन अँड्र्यूज, सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव प्रा. संतोष गवळी, पंचप्रमुख प्रशांत रणदिवे, वैभव माने, हर्षद मोघे, अमोल घोडके, लखन मोरे, सुधीर सालगुडे आणि महेश झांबरे यांनी खेळाडू व प्रशिक्षक शिवाजी वसपटे यांचे अभिनंदन केले.
सुवर्णपदक विजेते संघ : १४ वर्षांखालील मुले :
तनुज अजित संचेती (के.एल.ई. इंग्लिश मीडियम स्कूल, सोलापूर), आर्य अण्णासाहेब पवार ( व्ही. एम. मेहता प्रशाला, सोलापूर), विश्वजीत शिवाजी वसपटे (श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला, सोलापूर), रिषिकेश संजय चव्हाण (लिटल फ्लॉवर स्कूल, सोलापूर), सौरभ दादा शिंदे ( सी.एम.एस. इंग्लिश मीडियम हायर सेकंडरी स्कूल, निगडी, पुणे)
मुली : मृण्मयी लगदीर गायकवाड (नागेश करजगी ऑर्किड स्कूल, सोलापूर), आराध्या रविंद्र जाधव (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, सोलापूर) वंशिता निखिल लोहिया ( सेंट उज्वला हायस्कूल व हायर सेकंडरी स्कूल, आकुर्डी, पुणे), अमृता श्रीकुमार (सेंट उज्वला हायस्कूल व हायर सेकंडरी स्कूल, आकुर्डी, पुणे), नेत्रा बापू मगर (सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव, सोलापूर).
—–





















