पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका संघटक लहु दादा पाटील यांची पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे जन आरोग्य सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. लहु पाटील यांच्या कार्याची पक्षाने दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ज्येष्ठ नेते श्यामराव मदने ,बाबुराव पाटील, श्यामराव गलांडे, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच राहुल जावळे, अमोल मदने पाटील, नजीर मुलाणी, शिवाजी पिसे, आनंद पाटील, अज्ञान पाटील, पिलीव विकास सोसायटीचे चेअरमन पंकज मदने, अंकुश मदने, मायाप्पा जावळे, कांतीलाल पाटील सर, अजय खुर्द, यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















