बार्शी – दि. २१ जून २६ रोजी दुपारीच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या शेतात कुटुंबासह विहिरीवरील दगड उचलत होते. त्यावेळी आरोपी यांनी आमच्या शेतातील पाईपलाईन का बाजूला काढली असे म्हणून आरोपी जावेद मुलाणी याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर तलवारीने जखम केली व समीर मुलाणी, शौकत मुलाणी व इतर सहा लोकांनी फिर्यादीस व त्यांच्या कुटुंबीयास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर ४३२/२०२६ नुसार बी. एन. एस. कलम 118(2), 115(2) अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.
यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मे. सत्र न्यायालय बार्शी यांनी त्यांची जामीनावर मुक्तता केली. यातील आरोपी समीर मुलाणी व शौकत मुलाणी यांनी बार्शी येथील सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन अर्ज मांडला होता. सदर जामिन अर्जाच्या युक्तीवादावेळी वकिलांनी प्रभावी मुद्दे मांडले व सदरील युक्तिवाद ग्राह्य धरून बार्शी येथील मे. सत्र न्यायालय श्री. एस. व्ही. केंद्रे यांनी १५ हजाराच्या जातमुचकल्यावर आरोपीची जामीनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. रियाज शेख, ॲड. विजय गलांडे, ॲड. साकिब शेख व ॲड. अनिकेत सारुक यांनी काम पाहिले.
Post Views: 9