पिलीव – पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली येथील आश्विनी सोमाजीराव पाटील यांच्यावर पुणे येथील केईएम रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी या रुग्णालयाने दहा लाख पंचवीस हजार रुपयांचे बिल घेतले होते. आश्विनी पाटील यांचे माहेर माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील पताळे परिवारातील आहे. याबबातची माहीती माहेरच्या माणसांनी आरोग्यदुत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना सांगीतले. हे ऑपरेशन शासकीय योजनेतुन होणे आवश्यक होते. माञ सदरच्या रुग्णालय प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे या ऑपरेशनसाठी तब्बल दहा लाख पंचवीस हजार रुपये घेतले असल्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निदर्शनास आणले. याबाबत माजी आमदार रामभाऊ सातपुते रुग्णालय प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला .या पाठपुरावयानंतर रुग्णालय प्रशासन नरमले व अखेर 26 ऑक्टोबर रोजी केईएम रुग्णालयाने आश्विनी पाटील यांना 10 लाख 25 हजार रुपयांचा चेक परत केला .माळशिरस तालुक्याचे माजी आरोग्यदुत आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळे माळशिरस तालुक्यातील हजारो कुटुंबातील व्यक्तीची लाखो रुपयांची मोठ मोठी ऑपरेशन मोफत झाली आहेत. यामुळे अनेकांना जीवदान मिळाले असुन आर्थिक अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















