सोलापूर – सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी प्रशालेतील विद्यार्थी विज्ञान प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहेत. सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विज्ञान प्राविण्य परीक्षेत एकूण 50 विद्यार्थी बसले होते.त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड सर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक सौ.काळे एस.व्ही, श्री भांजे डी . बी, श्री मेहता आर आर, श्री साबा ओ.पी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 166