जेऊर – उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, सौरऊर्जा प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (अणुभट्टी) यांसारख्या प्रकल्पांविरोधात शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) भीमानगर–रांजणी चौक येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठे व यशस्वी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतकरी, मच्छीमार, वारकरी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उजनी धरणाचे पाणी, जमीन, पर्यावरण आणि लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आणत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात खासदार धैर्यशीलभैया मोहिते-पाटील, आमदार रोहितदादा पवार, आमदार नारायण आबा पाटील, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर,आमदार प्रतापसिंह पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
Post Views: 12