वळसंग – वळसंग (ता.द.सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य श्री वीरेश शंकर थळंगे यांना रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता नेशन बिल्डर अवार्ड हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.सदर पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम कन्यादान मंगल कार्यालय, मंद्रूप -निंबर्गी रोड, निंबर्गी ता.द. सोलापूर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अपर्णा सहस्त्रबुद्धे मॅडम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती प्रियांका आराध्ये यांच्यासह रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष दिनेश संभाजी काटकर हे उपस्थित होते.प्रस्तावना रोटे.अंजुटगी यांनी केले.वरील सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य वीरेश शंकर थळंगे यांना शाल, नॅपकीन बुके व गौरवपञ प्रदान करून अतिशय उत्साही वातावरणात सपत्नीक गौरविण्यात आले. सदर गौरवपञाचे वाचन कुमारी गौरी कल्लप्पा गुरव हिने केले.या कार्यक्रमास तानाजी जमादार , संजयकुमार धनशेटृटी, सिदधाराम भैरामडगी, बाळकृष्ण गुंड, श्रीमंत भोसले, गंगाधर बिराजदार,संतोष कस्तुरे, बसवराज दुधगी,विजय प्याटी, विजयालक्ष्मी थळंगे,सेवक कट्टेप्पा कोळी यांच्यासह सरांचे धर्मपत्नी ज्योती थळंगे व मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कामतकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे सचिव कल्लप्पा रामचंद्र गुरव यांनी केले.