धाराशिव – गुजरातमधील वडोदरा येथे 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या 45व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी धाराशिवच्या जितेंद्र वसावे याच्याकडे, तर मुलींच्या संघाची कर्णधारपदाची धुरा सोलापूरच्या स्नेहा लामकाने हिच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी राज्याचे दोन्ही प्रातिनिधिक संघ जाहीर केले. संघनिवडीनंतर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
——–
संघ ः कुमार मुले ः जतेंद्र वसावे (कर्णधार-धाराशिव), हरदया वसावे, सोत्या वळवी (सर्व धाराशिव), समर्थ सावंत, अर्जुन सेहजराव, सचिन सहानी (सर्व मुंबई उपनगर), अकबर शेख, ओंकार राजपूत (सर्व सोलापूर), समर्थ चव्हाण, अद्वैत बैत (सर्व पुणे), पार्थ देवकते (सांगली), तबरेज खान (सातारा), विनायक भांगे, आशिष गौतम (सर्व ठाणे), गौरव कुदळे (अहिल्यानगर). राखीव : ओमकार सावंत (ठाणे), भीमसिंग वसावे (धाराशिव), सुबोध चव्हाण (पुणे). मुख्य प्रशिक्षक : पंढरीनाथ बडगुजर (धुळे), सहाय्यक प्रशिक्षक : सुनील चव्हाण, व्यवस्थापक : श्रीकृष्ण कोळी (दोघे सोलापूर)
मुली : स्नेहा लामकाने (कर्णधार- सोलापूर), धनश्री तामखडे, वेदिका तामखडे, अनुष्का तामखडे (सर्व सांगली), धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, गुड्डी राठोड (सर्व ठाणे), मैथिली पवार (धाराशिव), कल्याणी लामकाने, प्राजक्ता बनसोडे (सर्व सोलापूर), श्वेता नवले, अपर्णा वर्धे (सर्व पुणे), नंदिनी सिसोदीया (धुळे), अक्षरा सोळंके (सातारा), आर्या भाटकर (मुंबई उपनगर). राखीव : जयश्री पवार (नाशिक), भवरम्मा उटगी (सांगली), स्वरांजली थोरात (धाराशिव). मुख्य प्रशिक्षक : अभिजित पाटील (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षिका : समृद्धी पाटील (ठाणे), व्यवस्थापिका : प्राची जेऊरे-बुह्राणपूरकर (सोलापूर)
——-
महाराष्ट्र संघात सोलापूरच्या 5 खेळाडूंची वर्णी
सहाय्यक प्रशिक्षक सुनील चव्हाण, व्यवस्थापकपदी कोळी व जेऊरे यांची निवड
सोलापूर ः महाराष्ट्र संघात सोलापूरच्या दोन कुमार व 3 मुली अशा 5 खेळाडूंची निवड झाली आहे. कुमार संघात वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाच अकबर शेख व येथील किरण स्पोर्टस क्लबचा ओंकार रजपूत याची निवड झाली. मुली संघात वाडीकुरोली (ता. पंढरपूर) कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या स्नेहा व कल्याणी लामकाने यांची तर वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाच्या प्राजक्ता बनसोडे हिची निवड झाली. स्नेहाकडे राज्याचे नेतृत्व सोपविले आहे. तसेच कुमार संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी उत्कर्ष क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक सुनील चव्हाण यांची वर्णी लागली आहे. तसेच कुमार संघाच्या संघ व्यवस्थापकपदी जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण कोळी तर मुलींच्या संघाच्या व्यवस्थापकपदी सिद्धेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राची नितीन जेऊरे-बुह्राणपूरकर यांची नियुक्ती केली आहे. सर्वांचे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सचिव उमाकांत गायकवाड तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























