Friday, November 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जातीचा गौरव वाटणे ही बहुजन समाजाची मृत्युघंटा आहे हे बहुजनांनी ओळखावे : जावेद पाशा कुरेशी 

तरुण भारतbyतरुण भारत
November 20, 2026
in solapur
0
जातीचा गौरव वाटणे ही बहुजन समाजाची मृत्युघंटा आहे हे बहुजनांनी ओळखावे : जावेद पाशा कुरेशी 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – जाती निर्मूलानासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी वर्णवादावर जोरदार हल्ला केला. जाती व्यवस्थेवर हल्ला केला आणि अठरा पगड जातीचा बहुजन समाज ही नव संकल्पना जन्माला घातली. महात्मा ज्योतिबा फुले हे बहुजनवादाचे पाया आहेत. छत्रपती शाहू महाराज हे इमारत आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन वादाचे कळस आहेत. परंतु आज बहुजन समाज ही आपल्या जातीच्या प्रेमात बुडाला आहे. ही महात्मा फुले यांच्या बहुजन समाज या कल्पनेची मृत्युघंटा आहे, हे बहुजनांनी ओळखावे असे प्रतिपादन नागपूरचे जेष्ठ साहित्यिक जावेद पाशा कुरेशी यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले जन्म द्विशताब्दी समिती सोलपुरच्या वतीने आयोजित प्रबोधन पर्वाचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी नेते तथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे होते.
यावेळी मंचावर जेष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता गायकवाड़, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव एम. डी. कमळे, महात्मा जोतिबा फुले जन्म द्विशताब्दी समितीचे अध्यक्ष प्राचार्य नरेश बदनोरे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवड़े, सचिव मनीष गडदे, कोषाध्यक्ष एड. गोविंद पाटील, सहसचिव प्रा. एम. आर. कांबळे आदी उपस्थित होते.
जावेद पाशा कुरेशी पुढे बोलताना म्हणाले की, महात्मा फुले यांनी ज्या बहुजन समाजाचा पाया रचला त्याची बीजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध आणि बहुजन संतानी क्रांती केली. पण पुष्यमित्र शुंग यांनी बौद्ध भिक्कूँची कत्तल करून जो बहुजन वाद गाडला. तो महात्मा फुले यांनी नव्याने जन्माला घातला. त्यांनी थेट ब्राम्हणवादी व्यवस्थेवरच हल्ला केला. त्यांनी ब्राम्हणी तावडीतुन शिक्षण बाहेर काढून बहुजन समाजाला खुले केले. कुणब्याच्या शेतीसुधारसाठी प्रयत्न केले. 1885 साली त्यांनी लाड़जी, शेटजी, भटजी यांनी स्थापनबल केलेली कॉंग्रेस नॅशनल कशी होऊ शकतो असा सवाल करून तेली, ताँबोळी, साळी, माळी, महार, मांगा शिवाय नैशनल होऊच शकत नाही, असा पहिला युक्तिवाद मांडला. हंटर कमीशन पुढे साक्ष देताना सरकारी उत्पन्न शाळेवर खर्च करा, असे सांगितले म्हणून महात्मा बहुजन हित मांडणारे पहिले महात्मा आहेत. हाताला लकवा मारलेला असताना त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहून सांस्कृतिक हत्यार बहुजन समाजाला दिला. अशा फूल्याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा शिष्य भेटला आणि त्यांनी बहुजन समाजाला भारतीय बनविले. राज्यघटनेच्या माध्यमातून नागरिकत्वाचे अधिकार दिले. स्वातंत्र्यापूर्वी या देशातील अकरा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता. तो शेटजी, भटजीना असणारा मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी शंभर टक्के नागरिकांना दिला. महत्वाचे म्हणजे माणूसपण नाकारलेल्या बहुजन समाजाला ही दिला. या सगळ्यातील बहुजन म्हणजे कुणी एक धर्म नाही. कुणी एक जात नाही. तो एक जात व धर्मविरहित विचार आहे. असेही ते म्हणाले. यावेळी राजाभाऊ सरवदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रशांत पाटील यांनी प्रस्ताविक केले. मनोज मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एड. स्नेहल पाटील यांनी अखंड गायन केले. प्रा. सुभाष शास्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी आभार मानले.
Views: 10
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप २६ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता स्थगित

Next Post

श्री वेंकटेश्वर देवस्थानम् याची देही याची डोळा’ रंगला श्री चा शाही कल्याणोत्सव!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री वेंकटेश्वर देवस्थानम् याची देही याची डोळा’ रंगला श्री चा शाही कल्याणोत्सव!

श्री वेंकटेश्वर देवस्थानम् याची देही याची डोळा’ रंगला श्री चा शाही कल्याणोत्सव!

ताज्या बातम्या

सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026

ई-बसच्या वाहक पदांवर महिलांना ५० टक्के प्राधान्य द्या

November 20, 2026
शायना एन.सी यांचा सांगोल्यात निषेध

शायना एन.सी यांचा सांगोल्यात निषेध

November 20, 2026

माढा न्यायालयातील कामकाज दुसऱ्या दिवसीही ठप्प

November 20, 2026
आदिनाथ कारखाना-भाळवणी-केम रस्त्याची दुरावस्था

आदिनाथ कारखाना-भाळवणी-केम रस्त्याची दुरावस्था

November 20, 2026

माढ्यात उसाचे ट्रॅक्टर आडवले

November 20, 2026

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपरिषदेची सर्व यंत्रणा सज्ज

November 20, 2026

ज्वारी संशोधन केंद्राच्या शेतातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

November 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1538752

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!