बार्शी – थोर योद्धे, शूरवीर आणि इतिहासात आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त उडान फाऊंडेशनच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप करण्याचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
समाजसेवा ही केवळ माणसांपुरती मर्यादित नसून, मुक्या जीवांची भूक आणि तहान ओळखून त्यांची सेवा करणे ही देखील खरी माणुसकी आहे. ज्यांना आपले दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही, अशा मुक्या जीवांच्या मुखात चारा देऊन त्यांच्या भुकेची जाणीव ठेवणे, हीच संवेदनशीलतेची आणि मानवतेची खरी ओळख आहे.
तसेच परभणी जिल्ह्यातील, करम गावातील व खाजानगर ४२२ येथील गरीब कुटुंबातील दोन्ही ताईच्या लग्नासाठी प्रत्येकी ४१०० रुपयांची आर्थिक मदत जयंतीच्या निमित्ताने केली.
उडान फाऊंडेशचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, कार्याध्यक्ष शकील मुलानी, सहसचिव मोहसीन पठाण, अख्तर शेख, रियाज बागवान, सादिक काझी व सदस्य कार्यकर्त्यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थेचे सदस्य जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक तुळशीदास मस्के, मामा हवालदार, डॉ. मौलाना शेख, नगरसेवक भैय्या बागड, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय ऊर्फ टिंकू पाटील, रिपाइंचे अध्यक्ष ॲड
अविनाश गायकवाड, सलीम मुल्ला, अध्यक्ष वसीम पठाण समशेरजी पठाण, महेश गोरे, दीपक ढावारे, सुरज मोरे, ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, बंटी गायकवाड, सनी गायकवाड, अमोल झांबरे , तोसिफ बागवान, सर्वांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. त्यामुळे समाजामध्ये बंधूभाव प्राणी मित्रांबद्दलची करुणा प्रेम दया निश्चितपणे बळकट होण्यास भविष्यामध्ये मदत होईल, असा विश्वास वाटतो. तसेच दुष्काळाच्या भयावह परिस्थितीत उपक्रम राबवणे गरजेचे आहे.