Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाण्यासह १२ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा इशारा….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 4, 2023
in solapur
0
पिंपरी-चिंचवड शहरात गारांचा जोरदार पाऊस
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काही जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत तुफान पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.

IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनक्रुमे ३४ ते २८ अशं सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर आज ठाणे आणि पालघरमध्येही रिमझिम पाऊस होऊ शकतो. तर धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. येत्या ३ ते ४ तासात नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

जळगावात वादळी पावसाचा कहर…

जळगावात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाली. अचानकच्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाला. वादळी वाऱ्याबरोबर विजांचाही कडकडाट होत असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र, सकाळी उन्हाचे चटके लागत होते आणि दुपारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी पाऊसही सुरू आहे.

धुळ्यातही पावसाची हजेरी…

धुळे शहरात आज सकाळी (रविवारी) जोरदार पावसाने हजेरी लावली. धुळे शहरातील काही भागात गारादेखील पडल्या. दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून दिवसभर उन्हाचा तडाखाही वाढला होता. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. हा पाऊस नुकसानकारक असला तरी खरिपासाठी योग्य असल्याची चर्चा शेतकरी वर्गामध्ये सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांनाही फटका बसणार आहे. अनेक जणांच्या शेतात कांदा काढून ठेवला असून, तो देखील सडण्याची शक्यता आहे.

Post Views: 103
Previous Post

मनमाड परिसरात वादळ – झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले, घरे कोसळली….

Next Post

आसाममध्ये 1,450 कोटी रुपयांच्या 4 NH प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आसाममध्ये 1,450 कोटी रुपयांच्या 4 NH प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ…..

आसाममध्ये 1,450 कोटी रुपयांच्या 4 NH प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ.....

ताज्या बातम्या

लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन विधी सेवा देणे काळाची गरज

March 1, 2026

संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत यश

March 1, 2026

तातडीने बससेवा सुरू करण्यासाठी थेट परिवहन मंत्र्यांकडे मागणी

March 1, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज

March 1, 2026

ओंकार कारखान्याचा गाळप हंगाम सांगता समारंभ

March 1, 2026

मावा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार

March 1, 2026

शहर पोलिसांची अनधिकृत भोंग्यांवर कारवाई

March 1, 2026

भव्य आणि आधुनिक ‘हाय-टेक’ बसस्थानकाचा मार्ग मोकळा; ३D डिझाईन प्रसिद्ध!

March 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710378

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697