पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे आसपासच्या दहा _ बारा खेडयासाठी पिलीव येथे एकच बॅक ऑफ इंडियाची राष्ट्रीयकृत बॅक ऑफ आहे. माञ या बँकेच्या सेवेबाबत खातेदारांच्या सतत तक्रारीच असतात. सध्या या बँकेतील प्रिंटरच बंद आहे. यामुळे पासबुक छपाई बंद आहे. यामुळे खातेदार याठिकाणी हेलपाटे मारुन जात आहे माञ कोणीही याठिकाणी दखलच घेत नाहीत. याचा सर्वच खातेदारांना प्रचंड ञास होत आहे. याठिकाणी ताबडतोब प्रिंटर दुरुस्त करावा अशी मागणी महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल व पिलीव पञकार संघाच्यावतीने बॅकेचे मॅनेजर प्रितम होरो यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलचे अध्यक्ष प्रमोद भैस, सचिव अतुल नष्टे, योगेश देशमुख, पञकार दामोदर लोखंडे, पिलीव पञकार संघाचे कार्याध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते . चौकट _ यावेळी शाखाधिकारी प्रितम होरो यांनी मी प्रिंटरची मागणी केली आहे. परंतू झोनल कार्यालयाकडुन अनेक शाखेची मागणी आहे सर्वांबरोबर तुम्हाला प्रिंटर मिळेल असे यावेळी बोलताना सांगीतले. चौकट _ यावेळी संजय पाटील यांनी सोलापूर येथील कार्यालयातील झोनल ऑफीसर यांच्याकडे याबाबत मोबाईलवरून चर्चा केली व गेल्या अनेक वर्षांपासून येथील प्रिंटर नादुरुस्त असतो हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्याची मागणी केली. फोटो _ पिलीव शाखेचे शाखाधिकारी प्रितम होरो यांना निवेदन देताना प्रमोद भैस, अतुल नष्टे, संजय पाटील, दामोदर लोखंडे.





















