Sunday, February 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१२ वर्षांनी बदली, शिक्षकासाठी चिमुकलीच नाही तर अख्खं गाव रडलं; असा सत्कार कुणी केला नसेल…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 22, 2023
in maharashtra
0
१२ वर्षांनी बदली, शिक्षकासाठी चिमुकलीच नाही तर अख्खं गाव रडलं; असा सत्कार कुणी केला नसेल…
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी बारा वर्षांपूर्वी लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. यावेळी या शाळेचा पट २० इतका होता. ही शाळा ऊसतोड मजूर कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जात होती. आज या शाळेमध्ये ५४ विद्यार्थी शिकतात.

लहू बोराटे हे फेब्रुवारी २०११ मध्ये शाळेत रुजू झाले. त्यानंतर तब्बल बारा वर्षे त्यांनी या शाळेमध्ये आपली शिक्षक सेवा पूर्ण केली आणि त्यांची १८ मे २०२३ ला हनुमाननगर शाळेमधून बदली झाली. ते नव्याने धनगर वस्ती तालुका जामखेड या ठिकाणी रुजू झाले. आपल्या बारा वर्षांच्या शिक्षक सेवेमध्ये त्यांनी शाळेचा पूर्ण कायापालट करून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शाळा, हस्ताक्षर स्पर्धा, हरित शाळा, तसेच शाळेला 3d पेंटिंग करून त्यामध्ये पाळीव प्राणी, हिंस्र प्राणी तसेच विविध पक्षी व मुळाक्षरे काढलेली आहेत. यातून विद्यार्थ्यांना खेळतानाही शिक्षण मिळावे, अशी अनोखी संकल्पना त्यांनी शाळेमध्ये राबवली. गावातले तरुण, पालक, आजी-आजोबांच्या भरवशावर मुलांना घरी ठेवून ऊसतोड कामगार गाव सोडून जात होते. तेव्हा लहू सर हेच त्यांचे पालक असायचे.

शाळेने फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये खूप वेळा आपले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे नाव कमावले आहे. या शाळेमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाले आहेत. तर विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर असेल, कुठली क्रीडा स्पर्धा असेल, अभ्यास असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करत राज्यात आणि जिल्ह्यात अनेक बक्षीसही मिळवले आहेत. हे झालं बोराटे गुरुजींमुळे.

बोराटे सरांना निरोप देण्यात आला. यासाठी पालक, आजी-माजी विद्यार्थी व बालानंद परिवार यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालक, माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, तसेच प्रदूषण आयुक्त दिलीपजी खेडकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रत्येकाचे अंत:करण कार्यक्रमादरम्यान भरून आले होते. विद्यार्थ्यांचा आणि पालकांच्या भावनांचा महापूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एका प्राथमिक शिक्षकावर ग्रामस्थ इतकं प्रेम करू शकतात यावर विश्वास बसत नाही. गेल्या बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत वेळेचे भान न ठेवता या शाळेसाठी आणि तेथील मुलांसाठी एक प्रेरणास्थान, एक आदर्श शिक्षक म्हणून एक गुरु म्हणून अनेकांना मार्गदर्शन केले. आणि म्हणूनच येथील सर्व पालक, तरुण आणि चिमुकले मुल त्यांच्यावर अपार प्रेम करतात. आजपर्यंत एका शिक्षकाचा असा सत्कार कुणी केला नसेल असा या हनुमाननगर वस्तीवरील भारजवडी गावातील ग्रामस्थांनी या शिक्षकांना निरोप दिला.

निरोप देताना सर्वच पालकांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाण्याच्या धारा वाहत होत्या. चिमुकली रडत होती. तर सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी, तरुण वर्ग आणि या परिसरातील सर्वच लोकांनी फुलांचा वर्षाव करत या शिक्षकांना निरोप दिला. आजपर्यंत अशा प्रकारचा निरोप एकही शिक्षकाला कधीच भेटला नसेल. प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असेल की मलाही अशाच प्रकारचा निरोप भेटायला पाहिजे…. असा निरोप लहू बोराटे सरांना आणि जपकर सरांना हनुमाननगर भारजवाडी या ग्रामस्थांनी दिला.

Post Views: 88
Previous Post

पालक डॉक्टर, स्वतः IIT पासआऊट; नोकरी सोडून कॅबचे स्वप्न पाहिले, महानगरीय जीवन बदलले….

Next Post

योग दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशी नागरिकांच्या आवाजात संघाची प्रार्थना ऐका….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
योग दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशी नागरिकांच्या आवाजात संघाची प्रार्थना ऐका….

योग दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशी नागरिकांच्या आवाजात संघाची प्रार्थना ऐका....

ताज्या बातम्या

भोकरदन मध्ये स्वच्छता अभियान #public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 22, 2026

ह्युमन कॅलक्युलेटर भंडारीची गणित कार्यशाळा संपन्न.#public #class #calculator #viral

February 22, 2026

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिंतूर पंचायत समिती अव्वल…#public #marathinews #viral #dance

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत. #public #marathinews #viral #maharashtranews #marathinews

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत #public #solapurnews #acsident #crime

February 22, 2026

शिवजयंती निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न..#public #shivajimaharajjayanti #yoga

February 22, 2026

हातावर मजकूर लिहून तिने संपवले जीवन. #public #crime #viral #trand #family

February 22, 2026

आईची आत्महत्या मुलाने दिली वडिलांविरुद्ध फिर्याद #public #marathinews #viral #maharashtranews

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0695770

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697