बकरी ईद तोंडावर आली असताना गोदान होऊन गोमाता गोशाळेत सुखरूप पोहच झाल्यामुळे गोरक्षक समाधानी…. दि.24/06/2023 रोजी शिवशंकर स्वामीच्या आव्हानाला प्रतिसाद देत जुन्नर तालुक्यातील (पेठेची वाडी) हडसर येथील शेतकरी राजाराम जबाजी भले यांनी 8 गोवंश, हडसरचे तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ रामा सांगडे यांनी 2 गोवंश व रूपा पुनाजी मुंढे यांनी 2 गोवंश असा एकूण 12 गोवंश हा गोरक्षकांच्या स्वाधीन करून गोशाळेत पाठवण्याची विनंती केली. सर्व गोवंश पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे सुखरूप पोहच करण्यात आला. या गोदानात स्थानिक नागरिक सीताराम रामचंद्र पवार,शिवाजी डुंबरे, मोतीराम लक्ष्मण भले,दिगंबर लक्ष्मण भले यांनी सहकार्य केले. गोवंश शेतकऱ्यांपासून गोशाळेतून पोहचवण्यासाठी शिवशंकर स्वामी यांचे सहकारी शिवराज संगनाळे, हर्षवर्धन कुऱ्हे, दुर्गेश जोशी,हेमंत कर्पे, अजिंक्य पानसरे यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल सर्व गोरक्षकांचे अभिनंदन….
शेतकरी बांधवांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार…..
शिवशंकर स्वामी व पुणे पांजरपोळ ट्रस्टचे विशेष आभार 
Post Views: 98