Sunday, July 6, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 1, 2023
in maharashtra
0
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार !
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे. त्याच वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता करुन बालेकिल्ला अधिक मजबूत करतानाच भाजपवरही चढाई करण्याची रणनीती काँग्रेसने आखल्याचं बोललं जातंय.

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेता जाहीर केला आहे. विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे काँग्रेसचं प्रदेशाध्यपद विदर्भात असताना, विरोधी पक्षनेतेपदही विदर्भातच देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलाय. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, सुनील केदार यांची नावे विरोधी पक्ष नेतेपदासाठी चर्चेत असताना वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावून काँग्रेसने डबल गेम खेळला आहे.

शिंदे-फडणवीसांचं सरकार असताना विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादीकडे होतं. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी द्यायची, याविषयी गेला आठवडाभर काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींमध्ये मंथन सुरु होतं. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चाही केली होती. दरम्यान विविध नेत्यांच्या नावावर या बैठकीत चर्चा झाली होती. अखेर वडेट्टीवारांच्या नावाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दर्शवला.

राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले, त्यावेळी काँग्रेसने काही महिन्यांसाठी ही जबाबदारी वडेट्टीवार यांच्या खांद्यावर सोपवली होती. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काही महिने शिल्लक असताना वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. सहा महिन्यात त्यांनी भाजपवर कडक प्रहार करुन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचं सोनं केलं. आक्रमकपणा, अभ्यासू भाषणं, विविध विषयाची सखोल जाण आणि प्रश्न तडीला नेण्याची वृत्ती अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विदर्भ ओळखला जातो. त्याच विदर्भातून सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही येतात. तिथेच विरोधी पक्षनेतेपद देऊन बालेकिल्ला अधिक मजबूत करतानाच भाजपवरही चढाई करण्याची रणनीती काँग्रेसने आखल्याचं बोललं जातंय.

विजय वडेट्टीवार यांची राजकीय कारकीर्द

विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून येतात. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत वडेट्टीवार यांचा मोठा सहभाग होता. शिवसेनेत असताना ते विविध विषयांवरून रोकठोक आंदोलने करायचे. तेव्हापासून विदर्भातील आक्रमक नेत्याची त्यांची प्रतिमा आहे.

वडेट्टीवारांनी १९८६ साली गडचिरोलीतून राजकारणाचा श्रीगणेशा केला. २००५ साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९८ – २००४ दरम्यान ते विधानपरिषद सदस्य होते. त्यानंतर चिमूर आणि आता ब्रम्हपूरी मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य आहेत. याआधी जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री तसेच मविआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे.

Previous Post

पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि एक लाखांचा चेक… पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली…..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group