सोलापूर – भाऊसाहेब गांधी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत वालचंद अभियांत्रिकी शिक्षक व शिक्षकेतर संघाने विजयी सलामी दिली. शिक्षक संघाने हिराचंद नेमचंदवर ८ गडी राखून विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात वालचंद अभियांत्रिकी शिक्षकेतर संघाने सिक्युरिटी संघावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन संरक्षण मंत्रालय, दक्षिण विभाग पुणे येथील जनसंपर्क अधिकारी व संस्थेचे माजी विद्यार्थी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे मानद सचिव डॉ. रणजीत गांधी उपस्थित होते. यावेळी विश्वस्त वैभव गांधी, पराग शहा, गणेश शितोळे, प्राचार्य डॉ. विजय आठवले, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, डॉ. सत्यजित शहा, डॉ. अश्विन बोन्दार्डे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक तसेच क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक :
हिराचंद नेमचंद : 8 षटकांत 75/8 : निखिल आंबुरे 43) पराभूत विरुद्ध वालचंद अभियांत्रिकी शिक्षक : 5.4 षटकांत 76/2 : श्रीशैल चमटगवडार 62, निखिल गज्जम, 3/19).
सिक्युरिटी संघ : 8 षटकांत 51/7 (नितीन पाटील, नरेश रेस आणि सोमनाथ धावळे प्रत्येकी 2 बळी ) पराभूत विरुद्ध वालचंद अभियांत्रिकी शिक्षकेतर : 4.4 षटकांत 52/0 ( विनायक फटफटवाले नाबाद 32).

















